नवी दिल्ली : देशभरात सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कालदेखील देशभरात इंधनाचे दर स्थिर होते. दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.३८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.८५ रुपये इतका झाला आहे.
तब्बल महिनाभराच्या स्थिरतेनंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दर किंचित कमी होण्यास नुकतीच सुरुवात झाली होती. मात्र, इंधनाच्या दरातील ही कपात अत्यंत धीम्या गतीने होत आहे. गेल्या काही दिवसांत डिझेलच्या दरात चारवेळा तर पेट्रोलच्या (Petrol) दरात जवळपास तीनवेळा कपात झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तब्बल 60 पैशांची कपात झाली आहे. मात्र, इतक्या लहान स्वरुपातील दरकपातीमुळे सामान्य नागरिकांना हवा तसा दिलासा मिळालेला नाही.
यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांकडून मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 14 आणि 16 पैशांनी स्वस्त झाले होते. त्यामुळे आता एक लीटर पेट्रोलसाठी मुंबईत 107.52 तर प्रतिलीटर डिझेलसाठी 96.48 रुपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 15 पैशांची कपात झाली. त्यामुळे याठिकाणी पेट्रोलसाठी 101.49 आणि एका लीटर डिझेलसाठी 88.92 रुपये मोजावे लागत आहेत.