पैशाशी संबंधित अशी बरीच कामे आहेत जी तुम्हाला 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करायची आहेत. अन्यथा, तुमचे बँकिंग व्यवहार ते शेअर बाजाराशी संबंधित व्यवहार अडकू शकतात. कोविड19 च्या साथीमुळे अनेक गोष्टींची अंतिम मुदत वित्त मंत्रालयाने वाढवली होती. यामध्ये आर्थिक वर्ष 2021 साठी रिटर्न भरणे (आयटीआर फाइलिंग) पासून पॅनला आधारशी जोडणे समाविष्ट आहे. जर तुम्ही ती केली नाही तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा होऊ शकते. अखेर ही कोणती कामे आहेत जी 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करणे खुप गरजेचे आहे ते जाणून घेवूयात…
1. 30 सप्टेंबर 2021 त्या व्यक्तींसाठी अखेरची तारीख आहे ज्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर रिटर्न दाखल केले नाही.
लास्ट डेट नंतर 5,000 रुपये लेट फायलिंग फी घेतली जाईल.
मात्र, एका आर्थिक वर्षात एकुण उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त नसेल तर हे शुल्क 1,000 रुपयांपेक्षा जास्त नसेल.
2. 1 ऑक्टोबर 2021 पासून बँक खात्यातून ऑटो-डेबिट पेमेंटसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशनची आवश्यकता असेल. यासाठी मोबाइल नंबर बँक अकाऊंटमध्ये योग्य असणे आवश्यक आहे.
याअभावी ऑटो-डेबिट पेमेंट न झाल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा नियम 30 सप्टेंबर 2021 पासून लागू होईल.
3.जर तुम्ही अजूनपर्यंत पॅनकार्डला आधारशी लिंक केले नसेल तर आजच करा.तुमच्याकडे आता केवळ 30 जूनपर्यंतचा वेळच शिल्लक आहे.
इन्कम टॅक्स विभागाने पॅनकार्डला आधारशी लिंक करण्याची डेडलाईन 30 जून 2021 ठरवली आहे.यानंतर सुद्धा ज्या लोकांचे पॅन लिंक होणार नाही त्यांना 1 हजार रुपये दंड द्यावा लागेल.या सोबतच पॅन निष्क्रिय केले जाईल.
4. भारतीय प्रतिस्पर्धा आणि विनिमय बोर्ड म्हणजे सेबीने घोषणा केली आहे की, गुंतवणुकदारांच्या डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यात केवायसी माहिती अपडेट कालमर्यादा 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे.
या तारखेनंतर संबंधीत व्यक्ती शेयर बाजारात व्यापार करू शकणार नाही कारण त्याचे डीमॅट/ट्रेडिंग खाते निष्क्रिय केले जाईल.
5. आर्थिक वर्ष 2021-22 साठी अॅडव्हान्स टॅक्सचा दुसरा हप्ता भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.
जर अॅडव्हान्स टॅक्स वेळेवर भरला नाही तर प्राप्तीकर कायदा, 1961 चे कलम 234बी आणि कलम 234सी च्या अंतर्गत देय करावर दंडात्मक व्याज लागू होईल. प्रति महिना 1 टक्काच्या दराने दंडात्मक व्याज लावले जाईल.