मुंबई : बँकिंग संबंधित कामांसाठी तुम्हाला पुढील महिन्यात जर बँकेत जाण्याची आवश्यकता असेल, तर लवकरात लवकर ते पूर्ण करून घ्या. कारण पुढील महिन्यात एकूण 12 सुट्ट्या असणार आहेत. त्यामध्ये शनिवार रविवारी येणाऱ्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. या सुट्ट्या लक्षात घेऊन नागरिकांना आपल्या आर्थिक कामांचे नियोजन करावे लागणार आहे
रिझर्व्ह बँकेने जारी केलेली बँकांच्या सुट्ट्यांची यादी
५ सप्टेंबर – रविवार
८ सप्टेंबर – श्रीमंत शंकरदेवा तिथी (गुवाहाटी)
९ सप्टेंबर – तीज हरितालिका (गंगटोक)
१० सप्टेंबर – गणेश चतुर्थी, संवत्सरी (चतुर्थी), विनायक चतुर्थी, वरसिद्धी विनायक व्रत (अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, नागपूर, पणजी)
११ – सप्टेंबर – महिन्यातील दुसरा शनिवार, गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस (पणजी)
१२ – सप्टेंबर – रविवार
१७ सप्टेंबर – कर्मा पूजा (रांची)
१९ सप्टेंबर रविवार
२० सप्टेंबर – इंद्रजत्रा (गंगटोक)
२१ सप्टेंबर – श्री नारायण गुरू समाधी दिवस (कोची, तिरुवनंतपुरम)
२५ सप्टेंबर – महिन्यातील चौथा शनिवार
२६ सप्टेंबर – रविवार
या सुट्ट्यांच्या यादीनुसार महाराष्ट्रामध्ये ५, १०, ११, १२, १९, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी बँका बंद राहणार आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण ७ दिवस बँकांचे कामकाज बंद राहील.