जळगाव प्रतिनिधी । कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच नागरीकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात एकाच दिवसात ५३ हजार नागरिकांना कोरोना लस देण्याचा विक्रम केला आहे. लसीकरण मोहिमेतील आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२ लाखाहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी गर्दी करीत आहे. आज शनिवारी जिल्ह्यात ३१ हजार ३६६ लाभार्थ्यांना पहिला तर २१ हजार ७२३ लाभार्थ्यांना दुसरा डोस असा एकूण ५३ हजार ०८९ जणांना लसीच्या मात्रा देण्याचा विक्रम नोंदवण्यात आला.
तालुकानिहाय झालेले लसीकरण आकडेवारी
जळगाव-३,१४,२९१, भुसावळ-१,६०,९०४ अमळनेर-७८,५७२, चोपडा-८१,०१३, पाचोरा-६७,२४१, भडगाव-४२,३६३, धरणगाव-४२,२६५, यावल-७१,८१३, एरंडोल-३७,४७, जामनेर-८०,६७३, रावेर-८५,८९५, पारोळा-४२,६३९, चाळीसगाव-९८,३०९, मुक्ताईनगर-३९,३५०, बोदवड-२३,०८४ याप्रमाणे लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.