नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. आज (शनिवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात देशात ४६ हजार ७५९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ३२ हजार ८०१ कोविड रुग्ण केवळ केरळमधून समोर आले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
तर गेल्या २४ तासांत तब्बल ५०९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर ३१ हजार ३७४ जणांनी करोनावर मात केली आहे.
देशात आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ४९ हजार ९४७ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ कोटी १८ लाख ५२ हजार ८०२ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात ३ लाख ५९ हजार ७७५ सक्रिय रुग्ण आहेत. करोनामुळे देशात आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ३७० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ६२ कोटी २९ लाख ८९ हजार १३४ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. गेल्या २४ तासात १ कोटी ३ लाख ३५ हजार २९० जणांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.