नवी दिल्ली – देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस देण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून यामुळे लसीकरणाला अधिक गती मिळेल.
१२ वर्ष वयोगटातील देशात मुलांची संख्या अंदाजित १२ कोटींपर्यंत असून सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना ही लस दिली जाईल असं सांगण्यात येतं आहे. डीसीजीआयकडून यासाठीची परवानगी मिळली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना ‘झायडस कॅडिला’ ही लस देण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना केंद्र सरकारच्या कोविड१९ वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एन.के. अरोरा यांनी सांगितले कि, देशात १२ ते १७ वयोगटातील सुमारे १२ कोटी मुलं आहेत त्यापैकी १ टक्क्यांपेक्षा कमी मुलांना आरोग्य समस्या असू शकतात, असा अंदाज असल्यामुळे या वयोगटातील मुलांना गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंत किंवा विषाणूमुळे मृत्यू होण्याच शक्यता नाही. उलट, त्यांच्या पालकांमध्ये १० ते १५ पटीने आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याची शक्यता असून शकते, जे साधारणतः १८ ते ४५ वयोगटातील आहेत. म्हणूनच, आम्ही मुलांना लसीकरण सुरू करण्यापूर्वी या (१८ ते ४५) गटाचे लसीकरण करण्यास प्राध्यान्य देत आहोत.