मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी प्रमुख भूमिका असलेली ‘शेरशाह’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. खऱ्या घटनांवर आधारित या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली. चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला पण तुम्हाला माहित आहे का सिद्धार्थ आणि कियारासह संपूर्ण टीमला किती फी मिळाली ते आता जाणून घेऊया.
बॉलिवूड लाईफमधील एका रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आणि बंदूक चालवण्यापासून शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले. या चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्राला सात कोटी रुपये देण्यात आले. तर कियारा अडवाणीला 4 कोटी रुपये देण्यात आले आहेत.दुसरीकडे, अजय सिंह राठोडची भूमिका साकारणाऱ्या निकेतन धीरला 35 लाख रुपये मिळाले आहेत. तर या चित्रपटात जीएल बत्राच्या भूमिकेत दिसलेल्या पवन कल्याणला 50 लाख रुपये मिळाले आहेत. प्रेक्षक सतत चित्रपटाला आपलं प्रेम देत आहेत.
तर दुसरीकडे या चित्रपटावर अनेक मोठ्या देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानसह इतर अनेक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.