जळगाव – श्रीगणेशाच्या आगमनाच्या दिवशी श्रावणाच्या अखेरीस जिल्हा परीसरात दमदार पावसाने हजेरी लावली असून सर्वात जास्त पाउस भडगांव तालुक्यात 49.0 तर सर्वात कमी धरणगाव येथे 0.0 मि.मी,सह जिल्हयात 2 सप्टेबर रोजी सरासरी 17.0मि.मी.सह 86.3 टक्के वार्षिक सरासरीची नोंद झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. जिल्हा परीसरात गेल्या दहा पंधरा दिवसांची विश्रांती घेवून पुन्हा पावसाने आगस्ट महिन्याच्या अखेरीस हजेरी लावत वार्षिक सरासरी 86.3 क्के सरासरी गाठत गेल्या दोन वर्षाची भर काढली आहे. गेल्या वर्षी 2 सप्टेंबर पर्यत केवळ 62.3 टक्के सरासरी पावसाची नोंद करण्यात आली होती. यावर्षी देखिल मॉन्सूनच्या सुरुवातीपासून 15 ते 20 दिवसांची दडी मारली होती पुन्हा यावर्षी देखिल दुष्काळास सामोरे जावे लागते कि काय या धास्तीने मेटाकुटीस आलेल्या बळीराजाला ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसाने धीर आला आहे.त्यामुळे खरीपाचे पिक बर्यापैकी हाती येईल असे चित्र जिल्हा परीसरात आहे.
सरासरीची नोंद
जिल्हयाची वार्षिक सरासरी पावसाची नोंद 663.3 मि.मी अपेक्षीत असून जळगाव 4.9 मि.मी (83.1टक्के) जामनेर 18.6(91.6), एरंडोल30.8(88.9), धरणगाव0.0(82.2), भुसावळ 1.3(93.6), यावल 3.0(99.8), रावेर 27.6(95.2), मुक्ताईनगर 0.0(98.0),बोदवड 0.6(88.7) पाचोरा 25.9(77.7), चाळीसगांव 26.0(68.3), भडगांव 49.0(76.1), अमळनेर 9.1(77.6), पारोळा 26.0(84.3), चोपडा 33.0(88.5र्)ें एकूण 255.7मि.मी सह 17.0 मि.मी. तर 10जून ते आतापर्यत 8586.7 मि.मी म्हणजेच 572.4 मिलीमिटर पावसाची वार्षिक सरासरीसह 86.3 टक्के नोंद झाली आहे.
बोदवड,यावल,अमळनेर,चाळीसगांव तालुक्यात भुईमूग सरासरी 78 टक्के तर सूर्यफूल लागवडीचे केवळ जामनेर तालुक्यात 5 टक्के क्षेत्र आहे. पारोळा तालुका वगळता अन्य ठिकाणी सोयाबीनचे क्षेत्र सूमारे 76 टक्के तर जळगाव तालुक्यासह जिल्हाभरात खरीप लागवडीखालील क्षेत्र सुमारे 89 टक्के आहे.
जिल्हा परीसरात सर्वात जास्त कापसाचे सुमारे 5लाख, 5हजार, 290 हेक्टर लागवडीचे क्षेत्र आहे. मका 84हजार 604, ज्वारी 38 हजार886, बाजरी 11हजार 793 हेक्टर तर तुर 12719, मूग 23692, उडीद 20044 अशी एकूण सरासरी 89 टक्के लागवडीखालील क्षेत्र आहे.
वार्षिक सरासरी पाऊस
वार्षिक सरासरीनुसार 572.4 मिलीमिटर पाउस ः यावल तालुक्यात 99.8 टक्के सरासरीची नोंद जिल्हयाची वार्षिक सरासरी पावसाची नोंद 663.3 मि.मी अपेक्षीत असून जळगाव 4.9 मि.मी (83.1टक्के) जामनेर 18.6(91.6), एरंडोल30.8(88.9), धरणगाव0.0(82.2), भुसावळ 1.3(93.6), यावल 3.0(99.8), रावेर 27.6(95.2), मुक्ताईनगर 0.0(98.0),बोदवड 0.6(88.7) पाचोरा 25.9(77.7), चाळीसगांव 26.0(68.3), भडगांव 49.0(76.1), अमळनेर 9.1(77.6), पारोळा 26.0(84.3), चोपडा 33.0(88.5र्)ें एकूण 255.7मि.मी सह 17.0 मि.मी. तर 10जून ते आतापर्यत 8586.7 मि.मी म्हणजेच 572.4 मिलीमिटर पावसाची वार्षिक सरासरीसह 86.3 टक्के नोंद.