दहावी पास असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून १३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती मिळणार आहे.
या पदांसाठी होणार भरती?
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशनुसार फिटरची ३० पदे, टर्नरची ०४पदे आणि मशिनिस्टच्या ०४ पदांवर भरती केली जाणार आहे. तसेच इलेक्ट्रीशियनच्या ३० आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकच्या ३० पदांची भरती केली जाणार आहे. त्याचबरोबर वेल्डरची ०४ पदे आणि कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंटची ०५ पदे भरले जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता :
दहावी पास असण्यासोबतच आयटीआय केलेलं असणं गरजेचं आहे.
वयोमर्यादा :
पात्र उमेदवारांचं वय 14 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2021 (04:00 PM)
भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2021 (05:00 PM)
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: HR Officer Nuclear Training Centre, Rawatbhata Rajasthan Site NPCIL, P.O.-Anushakti, Via-Kota (Rajasthan), Pin- 323303
असा करा अर्ज
सर्वप्रथम http://www.apprenticeship.org/ किंवा https://apprenticeship.gov.in/ या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करा. यानंतर इस्टेबलिशमेंट रजिस्ट्रेशन नंबर मिळले. पुढे https://www.npcilcareers.co.in/ वर जा आणि ऑनलाईन अर्ज करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जाहिरात (Notification): PDF