मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचा भाव जैसे थेच ठेवला आहे. दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.३८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.८५ रुपये इतका झाला आहे.
त्यापूर्वी बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले होते. तर मंगळवारी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी १५ पैशांची कपात केली होती. त्याआधी सोमवारी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले होते. रविवारी ३५ दिवसांनंतर पेट्रोल २० पैशांनी स्वस्त झाले होते.
मुंबईत आज गुरुवारी एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.५२ रुपये आहे.आज दिल्लीत पेट्रोल १०१.४९ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.२० रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.८२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.९१ रुप्यानापर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.९८ रुपये झाले आहे.
आज देशभरात डिझेलचा भाव स्थिर आहे. मुंबईत डिझेलचा भाव ९६.४८ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८८.९२ रुपये आहे. चेन्नईत ९३.५२ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.९८ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.७२ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.३४ रुपये आहे.