मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची गुंतवणूकदारांमध्ये अजूनही धास्ती कायम आहे. त्याचे पडसाद कमॉडिटी बाजारावर उमटत आहे. कमॉडिटी बाजारात सलग दुसऱ्या सत्रात सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली आहे. आज सोनं २६१ रुपयांनी आणि चांदी २९४ रुपयांनी स्वस्त झाली आहे.
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४७३७८ रुपये आहे. तर एक किलो चांदीचा भाव ६३१८३ रुपये आहे. त्यात २९१ रुपयांची घसरण झाली आहे. काल मंगळवारी सोने ६० रुपयांनी तर चांदी ११० रुपयांनी स्वस्त झाली होती.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६६० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४७६६० रुपये झाला आहे. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६१० रुपये इतका झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०८४० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४६९० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८७५० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६९६० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९६६० रुपये आहे.