पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या परीक्षेचे ॲडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. ही परीक्षा 4 सप्टेंबरला होणार आहे.
याकडे लक्ष द्या
– नवे प्रवेशपत्र डाऊनलोड करून, त्याची प्रिंट काढलेले मूळ स्वरुपातील प्रवेशपत्र सोबत आणावे.
– नव्या प्रवेशपत्राशिवाय परीक्षेसाठी प्रवेश मिळणार नाही.
– आधारकार्ड, लायसन्स, मतदान कार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड यापैकी एक ओळपत्रप म्हणून सोबत आणावे, त्यासोबत त्याची छायांकित प्रत सोबत आणणेही अनिवार्य आहे. केवळ छायांकित पत्र सोबत आणल्यास परीक्षा देता येणार नाही.
– परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर
मार्च महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता 4 सप्टेंबरला परीक्षा आयोजित केली जाणार आहे.