जळगाव : महावितरणच्या चोपडा-2 उपविभागामार्फत 18 ते 20 ऑगस्टदरम्यान राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत २४ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली आहे.
हातेड 7, लासुर 9 व चोपडा ग्रामीण शाखेअंतर्गत 8 अशा एकूण 24 वीजचोरांवर विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली. या सर्वांना एकूण 12080 युनिट वीज आकाराची 1 लाख 51 हजार 320 व तडजोड शुल्क 50 हजार अशी 2 लाख 1 हजार 320 रुपये रकमेची वीजचोरीची देयके देण्यात आली आहेत. वीजचोरी करणाऱ्यांनी सदर देयकाचा भरणा न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता फारुक शेख, धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता एस. एम. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सहाय्यक अभियंता पी. एस. पाटील, पी. एस. टेकाडे, एम. एस. गांजुडे व संबंधित शाखेचे सर्व जनमित्रांनी सहभाग घेतला.