न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या ३०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांना १ सप्टेंबरपासून यासाठी अर्ज करता येणार आहे.
रिक्त पदाचा तपशील
या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण 300 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 104 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. ओबीसीसाठी 81 जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच ईडब्ल्यूएससाठी 30 जागा, एससीसाठी 46 जागा, एसटीसाठी 22 जागा आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 17 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
पात्रता
उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. अर्जदार 60% गुणांसह पदवीधर असावेत. इतर पात्रता तपशीलांसाठी, आपण अधिकृत अधिसूचना पाहू शकता.
वयोमर्यादा
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमधील प्रशासकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत सूट असेल. 1 एप्रिल 2021 रोजी वय मोजले जाईल.
अर्जाचं शुल्क
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमधील प्रशासकीय अधिकारी पदासाठी खुल्या आणि ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्जाचं शुल्क 600 रुपये निश्चित करण्यात आले आहे.एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये जमा करावे लागतील. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने फी भरता येईल.
परीक्षा (Online):
Phase-I: ऑक्टोबर 2021
Phase-II: नोव्हेंबर 2021
जाहिरात (Notification) : PDF
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा