जळगाव प्रतिनिधी | राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिका व नवनिर्मित नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा २३ ऑगस्टपासून तयार करण्याचे आदेश शुक्रवारी दिले.
त्यात जिल्ह्यातील मुक्ताईनगर, शेंदुर्णी व जामनेर या नगरपालिका वगळता १३ नपा व तीन नगरपंचायतींचा समावेश आहे, असे नगरपालिका शाखेचे प्रशासन अधिकारी समीर दिघे यांनी सांगितले. आता या नगरपालिकांत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे.
या ठिकाणी होतील निवडणुका
पाचोरा, चोपडा, पारोळा, एरंडोल, धरणगाव, यावल, रावेर, फैजपूर, सावदा, चाळीसगाव, भुसावळ, अमळनेर, नशिराबाद, बोदवड, वरणगाव व भडगाव या ठिकाणी निवडणुका होतील.