नांदेड – छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी जवानांवर भ्याड हल्ला केला आहे. इंडो तिबेटीयन बटालियनच्या जवानावर माओवाद्यांनी गोळीबार केला असून या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून यामध्ये नांदेड जिल्ह्यतील जवान सुधाकर शिंदे,गुरमुख सिहं यांचा समावेश आहे.
मुखेड तालुक्यातील बामणी येथील जवान सुधाकर शिंदे हे काल दुपारी शहीद झालेत आहे. सुधाकर शिंदे हे इंडो तिबेटीयन बटालियनमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत होते.
शहीद सुधाकर शिंदे यांच्या पार्थिवावर आज मुळगावी बामणी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.