नांदेड – सुरूवातीच्या कलांमध्ये नांदेडमधून अशोक चव्हाण पिछाडीवर आहेत. महाराष्ट्रतील काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात सरळ लढत आहे. वंचित बहुजन आघाडीनं यशपाल भिंगे यांना उमेदवारी दिली आहे.
गेल्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही अशोक चव्हाण खासदार महाराष्ट्रातून निवडून आले होते. स्थानिक स्वराज्य संस्था आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून चव्हाणांची जिल्ह्यावर पकड असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे इतिहासात डोकवल्यास नादेडकरांनी दर १५ वर्षाला येथे धक्कादायक निकाल दिला आहे.संपूर्ण भारतात मोदी लाट नसून त्सुनामी आल्याचे बोलले जात आहे