पुणे येथील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय यांच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती निघाली आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत आहे. या पदासाठी उमेदवाराला ३५ हजार पर्यंत दरमहा पगार देण्यात येईल.
ही भरती एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा प्रकल्प संपण्याच्या मुदतीपर्यंत असणार आहे. उमेदवाराच्या कामाची गुणवत्ता पाहून कामाचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढविण्यात येऊ शकतो.
शैक्षणिक पात्रता : विविध पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसंदर्भात नोटिफिकेशनमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
वयो मर्यादा : २८ ऑगस्टपर्यंत उमेदवाराचे किमान वय २१ आणि कमाल ४५ वर्षे असणे गरजेचे आहे.
> उमेदवाराची मुलाखत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येईल.
> निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीवर रुजू होताना मेडिकल सर्टिफिकेट तसेच इतर मूळ कागदपत्र पडताळणीसाठी सोबत आणणे आवश्यक आहे. त्याआधी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
> उमेदवारांनी दिनांक २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायला हवे. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. तसेच मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
>उमेदवारांनी recruitment.dogr@icar.gov.in या ईमेल आयडीवर अर्ज करायचा आहे.
जाहिरात (Notification) PDF