Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भादलीकरांसाठी कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी : पालकमंत्री

ना. गुलाबराव पाटलांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपुजन

tdadmin by tdadmin
August 19, 2021
in जळगाव
0
भादलीकरांसाठी कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी : पालकमंत्री
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव (प्रतिनिधी ) : ग्रामीण भागातील जनतेला वॉटर, मीटर, गटर या पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. यामुळे जनतेची जी मागणी असेल ती पूर्ण करणे हे आपले आद्य कर्तव्य असून ते पूर्ण करण्याला आपले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील भादली येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करतांना ते बोलत होते. भादलीला परिसरातील सर्व महत्वाच्या गावांना जोडण्यासाठी तब्बल १६ कोटी रूपयांची तरतूद असणार्‍या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांना याप्रसंगी दिली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे होते.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपुजन स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आले. तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायत इमारतीच्या निधीसाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या नव्या इमारतीचे भूमिपुजन करण्यात आले. यासोबत स्थानिक विकास निधी अंतर्गत दत्त मंदिर परिसरात पाच लाख रूपयांचे पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. सरपंच मिलींद चौधरी प्रास्ताविक करतांना म्हणाले की, ग्रामसचिवालय हे खूप महत्वाचे स्थान असते. आम्ही या वास्तूसाठी शब्द टाकताच त्यांनी गावकर्‍यांच्या प्रेमापोटी २५ लक्षांचे काम दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

*जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील म्हणाले की, पालकमंत्र्यांकडे काम मागितल्यानंतर ते तात्काळ मंजूर होते याचा एकदा नव्हे तर मला शंभरदा अनुभव आला आहे. यामुळे भादली गटात अनेक कामे करता आली. तर भाऊंच्याच मदतीने नशिराबादला ६ कोटींचे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासाठी उभे राहत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे म्हणाले की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे अजातशत्रू व्यक्तीमत्व असून त्यांच्याकडे कोणताही राजकीय भेद आपल्याला दिसून येत नाही. ते खर्‍या अर्थाने विकासाची मुलूखमैदान तोफ असल्याची स्तुतीसुमनेही त्यांनी उधळली. तर आसोद्याच्या उपसरपंच वर्षा भोळे यांनी देखील आपल्या मनोगताने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

याप्रसंगी बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात कोणताही राजकीय भेद न बाळगता विकासकामांना मंजुरी देण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत. भादली ग्रामपंचायतीला शंभर वर्षे पूर्ण झाली असून याची इमारत जीर्ण झाली आहे. यामुळे ग्रामस्थांनी याबाबतची माहिती देताच ग्रामपंचायत कार्यालयासाठी पंचवीस लाभ रूपयांचा निधी प्रदान करण्यात आला असून याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर याच प्रमाणे पेव्हर ब्लॉकचे काम सुध्दा सुरू करण्यात आले असून गावकर्‍यांसाठी नवीन पाण्याची टाकी देखील लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

दरम्यान, भादली गावाच्या एकोप्याचे आपल्याला खूप कौतुक वाटत असून ही एकी भविष्यातही कायम रहायला हवी अशी अपेक्षा ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, आपण भादली येथील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शेळगाव बंधार्‍यावर ४४ कोटी रूपयांचा पुल झाल्याने भादलीच्या विकासाला गती मिळणार असल्याचे प्रतिपादनही पालकमंत्र्यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे छगन खडसे , विभाग प्रमुख हिरालाल कोळी (आबा) व ग्रामपंचायत ती मार्फत करण्यात आले होते.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे , जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील , तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, पं. स. सदस्या जागृती चौधरी , सरपंच मिलिंद चौधरी , श्याम कोगटा, छगन खडसे , विभाग प्रमुख हिरालाल कोळी (आबा), जितु नारखेडे, निळू नारखेडे , आसोदा उपसरपंच वर्षाताई भोळे, तुषार महाजन , शरद नारखेडे , अजय महाजन , गिरीश भोळे, किशोर चौधरी , युवराज कोळी परिसरातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्राम्सथ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश माने यांनी केले तर आभार भुषण पाटील यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

क.ब.चौ. विद्यापीठ जळगाव येथे ‘या’ पदांसाठी निघाली भरती

Next Post

महावितरणमध्ये विविध पदांच्या १४९ जागा, १० वी, ITI उत्तीर्णांना संधी

Related Posts

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
Next Post
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती

महावितरणमध्ये विविध पदांच्या १४९ जागा, १० वी, ITI उत्तीर्णांना संधी

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us