जळगाव प्रतिनिधी । राज्यभर गाजलेल्या बीएचआर प्रकरणी जळगाव विधान परिषदेचे आ.चंदूलाल पटेल यांचा अटकपूर्व जामीन पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या न्यायालयाने मंजूर केला आहे. आ. पटेल यांना १ लाखच्या जातमुचलक्यावर अटकपुर्व मंजूर केला आहे.
राज्यातील बहुचर्चीत असलेले बीएचआर अपहार व घोटाळा प्रकरण चांगलेच गाजत आहे. यापुर्वी काही दिवसांपुवी मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून अटक केली होती. याच प्रकरणात आ.चंदूलाल पटेल यांच्यावर देखील ठेवी मॅनेज केल्याचा आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून आ.पटेल नॉट रीचेबल असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, आ.पटेल यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पुणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
याचिकेवर न्या.गोसावी यांच्यासमोर सुनावणी झाली असता आ.पटेल यांना १ लाखाच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. आ.पटेल यांच्याकडून ऍड.अनिकेत निकम यांनी काम पाहिले. दरम्यान आ पटेल यांना ठेवीच्या २०% रक्कम अनामत म्हणून न्यायालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.