जळगाव प्रतिनिधी : जुलै-ऑगस्टचा हंगाम सराफ बाजारासाठी मंदीचा काळ असतो. पण आता दर कमी झाल्याने अनेक जण गुंतवणूक म्हणून तसेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येणाऱ्या लग्नसराईसाठी सोने खरेदी करत आहेत. सुवर्णनगरी असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात देखील सोने व चांदी खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे.
मागील गेल्या काही दिवसात जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहे. सोने 47 हजार रुपये प्रतितोळा तर चांदी 63 हजार रुपये प्रतिकिलोच्या घरात आली आहे.
कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोने व चांदीव्यतिरिक्त अन्य पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील परिस्थिती वेगाने बदलत आहे. सराफ बाजारात एरवी होणाऱ्या उलढालीच्या तुलनेत 40 ते 50 टक्क्यांनी उलाढाल वाढली आहे.
जळगाव सराफ बाजारात आज सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४७ हजार ४५० रुपये आहे. तर चांदीचा एक किलोचा भाव ६३ हजार ३१० रुपये आहे.