नवी दिल्ली : तुम्हाला जर छोट्या कमाईद्वारे मोठी रक्कम बनवायची असेल तर पोस्ट ऑफिस तुम्हाला एक खास संधी देत आहे. पोस्टाची अशी एक योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही दररोज फक्त 95 रुपये जमा केल्यास 15 वर्षांनंतर तुम्हाला कमीत-कमी 14 लाख रुपये मिळतील. ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना असे या योजनेचे नाव आहे. ही योजना त्या लोकांसाठी खुप लाभदायक आहे, ज्यांना वेळोवेळी पैशांची आवश्यकता असते.
यामध्ये दररोज फक्त 95 रुपये जमा करून तुम्ही मुदतीअंती 14 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळवू शकता. याशिवाय मनीबॅकचा लाभही घेता येतो. त्यामुळे जितकी रक्कम गुंतवली आहे ती सगळी परत मिळते. या योजनेत पॉलिसीधारकाला मॅच्युरिटी बोनसही मिळेल.
या योजनेत तुम्ही 15 वर्षं आणि 20 वर्षं अशा दोन कालावधीसाठी पैसे जमा करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदाराचे किमान वय 19 वर्षं आणि जास्तीत जास्त 45 वर्षं असले पाहिजे.
योजनेचे फायदे
या योजनेत मनीबॅक सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. यामध्ये पॉलिसीधारकास 10 लाखांपर्यंतची विमा रक्कम मिळते. पॉलिसीची मुदत पूर्ण होईपर्यंत म्हणजेच म्यॅच्योर होईपर्यंत एखादी व्यक्ती जिवंत राहिली तर त्याला मनी बॅकचा फायदा होतो. मनी बॅकचा तीन वेळा हा लाभ मिळतो. या अंतर्गत 15 वर्षांच्या पॉलिसीमध्ये सहा वर्षं, नऊ वर्षं आणि 12 वर्षं पूर्ण झाल्यावर 20-20 टक्के रक्कम परत मिळते. मुदतपूर्तीनंतर बोनससह उर्वरित 40 टक्के रक्कमदेखील दिली जाते.
इतका भरावा लागेल हप्ता
जर एखादी व्यक्ती 25 वर्षांची असेल तर सात लाख रुपयांच्या रकमेसाठी 20 वर्षांच्या मुदतीकरिता दरमहा 2853 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. म्हणजेच दररोज सुमारे 95 रुपयांची बचत करावी लागेल. वार्षिक प्रीमियम 32 हजार 735 रुपये असेल. सहा महिन्यांसाठी तो 16 हजार 715 रुपये आणि तीन महिन्यांसाठी 8 हजार 449 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.