फैजपूर प्रतिनिधी: ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फैजपूर नगरीत पत्रकारांच्या हक्कांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देऊन कमी कालावधीत अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल करीत असून संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष फारुक शेख यांचे कार्य प्रशंसनीय आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले आहे.
पत्रकार संस्था फैजपूर नुकतीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई या संघटनेशी संलग्न करण्यात आली असून त्यासंदर्भात फैजपूर येथे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संस्था कार्यालयात पार पडली.संघटनेच्या वतीने येत्या काळात राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम यासंदर्भात सविस्तर चर्चा करून यापुढे सर्व उपक्रम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व पत्रकार संस्था फैजपूर संयुक्तपणे राबविणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी पत्रकार संस्था फैजपूर वतीने संस्थाध्यक्ष फारुक शेख यांनी शाल , पुष्पगुच्छ देऊन प्रविण सपकाळे व विलास ताठे यांचा सत्कार करण्यात आला.बैठकिला पत्रकार संस्था सचिव व ज्येष्ठ पत्रकार सावदा शामकांत पाटील,पत्रकार संघ रावेर तालुकाध्यक्ष विलास ताठे, पत्रकार संस्था फैजपूर चे समीर तडवी, संदिप पाटील, साजीद शेख, मुबारक तडवी, देवेंद्र झोपे इ.उपस्थित होते.