रावेर,(भागवत महाजन)- विवरे येथे ९ ऑगस्ट हा क्रांतीकारक दिवस साजरा करण्याता आला क्रांती कारक महामानव बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला सरपंच युनुस तडवी यांनी पुष्पहार घालुन प्रतिम चे पुजन केले तसेच ग्रापंचायत माजी सरपंच वासुदेव नरवाडे यांनी बिरसा मुंडा व आदिवासी बद्दल माहीती सविस्तर सांगितली तीआदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे शक्य व्हावे यासाठी आदिवासी बहूल जिल्ह्यामध्ये विविध सुविधा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन स्तरावर स्वतंत्र असे आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करुन हमखास असा निधी या विकासकामांना दिला जातो. राज्यात गडचिरोली, नंदूरबार आणि पालघर हे जिल्हे मुख्यत्वेकरुन आदिवासी बहूल जिल्हे आहेत.
या जिल्ह्यात भौगोलिक आव्हानांवर मात करीत या सर्व समाजाला आरोग्य, शिक्षण, परिवहन सुविधा आदींनी जोडून मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी आश्रमशाळा तसेच वसतीगृहे उपलब्ध करुन दिली जात आहेत. केवळ इतके करुन होत नाही तर इतर मुलांच्या बरोबरीने त्यांना स्पर्धा करता यावी यासाठी त्यांच्यासाठी नामांकित शाळांमध्ये शिक्षणदेखील आता नव्याने सुरु झाले आहे.
याठिकाणी आदीम जमातींचा अधिवास अतिशय दुर्गम भागात आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा पुरविणे देखील एक मोठे आव्हान आहे. मात्र यात दळण-वळण साधने व इतर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे माडिया, गोंड तसेच परधान आदी आदीम जमाती आहेत. आदिवासींची मूळ भाषा आहे, यात माडिया -गोंडी या दोन मुख्य भाषा गडचिरोली जिल्ह्यात आहेत. या जमातीत मुख्य समाज भाषा रुजवताना त्यांची मूळ भाषा असणाऱ्या गोंडी-माडिया आदी भाषांचे संवर्धन कसे होईल. याबाबतही प्रयत्न जाणीवपूर्वक सुरु करण्यात आले आहेत. त्यांच्या रुढी, परंपरा यांची माहिती इतरांना मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत.
कधीकाळी आदिवासी समाज म्हणजे जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज असणारी ओळख आता आदिवासी समाजनेही पुसून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपूण्य दाखविणाऱ्यांचा टक्कादेखील वाढला आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण झालेली आपणास इथे दिसते. आदिवासींना ढाल करुन काही शक्तींनी मधल्या काळात या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र खऱ्या-खोट्याचा बोध झालेला आदिवासी आज नक्षलवाद्यांनाही विकासात आडवे येवू नका असे छातीठोकपणे सांगत आहे. पोलीस दलाच्या सहाय्याने नक्षलवाद्यांचा उघड विरोध करुन इथं आता विकासवाटेवर वाटचाल सुरु झाली आहे, असेच या सर्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणता येईल. असे सुचक आदिवासी समाज हितासाठी सांगितले.
यांची होती उपस्थिती – सरपंच युनुस तडवी उपसरपंच भाग्यश्री पाटील वासुदेव नरवाडे सदस्य स्नेहा पाचपांडे ज्योति सपकाळ , श्रीमती रेखा गाढे , नौशाद बी खाँ, युसुफ खाटीक दिपक राणे , विपीन राणे, निलिमा सनसे , पुनम बोंडे, मनिषा पाचपांडे , ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते , इस्माईल खाँ , सुपडु तडवी , मौलाना संजु तडवी , मेहरबान तडवी , गफ्फार तडवी , जेमशेर तडवी , मोहमद तडवी , नाजुद्दीन तडवी , नबी तडवी, सर्व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते तसेच सदस्य विनोद मोरे यांनी सर्वांचे आभार मानले .