राज्याच्या आरोग्य विभागात 3 हजार 466 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागातील ही भरती ड गटातील 3 हजार 466 जागांसाठी असणार आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीच्या जाहिरातीतील शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमधून उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.
कोणत्या पदांची भरती?
सार्वजनिक आरोग्य विभागात (गट-क) अंतर्गत एकूण ५२ पदाच्या एकूण २७२५ जागा भरण्यात येणार आहेत. भंडार नि वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, एक्सरे तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, दंत यांत्रिकी, डायलिसिस तंत्रज्ञ, दूरध्वनीचालक, वाहनचालक, शिंपी, नळकारागीर, सुतार, नेत्र चिकित्सा अधिकारी, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, भौतिकोपचार तज्ञ, व्यवसोपचार तज्ञ, वार्डन, कनिष्ठ लिपिक, दंतआरोग्यगक, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहायक,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, पेशी तज्ञ, ग्रंथपाल आणि इतर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ प्रयोगशाळा तंत्रज्ञान पॅरामेडिकल पदवी/B.Sc/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Pharm/M.Pharm/GNM/B.Sc (नर्सिंग)/वाहनचालक परवाना/ITI (इलेक्ट्रिशियन/कुशल कारागिर/टेलर/कारपेंटर/B.Sc.(Hon.)/ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा./मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा./10वी+मराठी & इंग्रजी टायपिंग.
वयाची अट:
- प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी: 30 जून 2021 रोजी 18 ते 40 वर्षे.
- उर्वरित पदे: 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क : मागास: ₹600/- [मागासवर्गीय/EWS: ₹400/-]
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वेबसाइटवर ६ ऑगस्टपासून खुली करण्यात आली आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2021
जाहिरात (Notification) : PDF