जामनेर,(प्रतिनिधी)- येथील जी.एम.न्यूज चे संपादक मिलिंद लोखंडे यांचे जेष्ठ सुपूत्र स्वप्नील लोखंडे वय-१८ यांचे
आज दिनांक ०८-०८-२०२१ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
स्वप्नील यास मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.दरम्यान प्रकृती बिघडल्याने आज स्वप्नीलने अखेरचा श्वास घेतला. मनाला चटका लावून जाणारी घटना घडली.तरी अंत्ययात्रा ०९-०८-२०२१ रोजी सकाळी १० वा. गिरिजा कॉलनी, हिवरखेडा रोड,जामनेर येथून निघणार आहे.