जळगाव – सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था (जळगाव शाखा ) व ग्लोबल फाउंडेशन जळगाव तर्फे स्वामी समर्थ केंद्र जळगाव येथे वसुंधरा दिना निमित्त शनिवार रोजी वृक्षारोपण करण्यात आले.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा -हास होत आहे व विविध व्याधींनी मनुष्य हा वेढला जातो आहे, यासाठी संस्था नेहमी पर्यावरण पूरक कार्यक्रम राबवत असते, असाच एखादा उपक्रम या परिसरातही राबवला जावा याकरीता जिल्हा परिषद काॅलनी जळगाव येथे सुरु असलेल्या नियोजित स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम ठिकाणी सुद्धा नैसर्गिक वातावरण निर्मिती व्हावी, येथील वातावरण शुध्द रहावे , यासाठी सखी श्रावणी संस्थेस निमंत्रित केले होते . या अनुषंघाने
या ठिकाणी सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था (जळगाव शाखा ) व ग्लोबल फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने सुमारे 30 वृक्षाचे रोपे देवून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मंदिरा साठी या संस्थांनी केलेल्या वृक्षारोपणाचे मंदिर ट्रस्टी यांनी कौतुक करीत आभार मानले , व या इवल्याशा रोपांचा आम्हि सांभळ करू व डेरेदार वृक्ष करु याची ग्वाहि मनोज चौधरी यांनी यावेळी दिली .
पुढील वर्षी आपण सर्व पुन्हा याच दिवशी एकत्र येऊन या वृक्षांचा वाढदिवस साजरा करु असे प्रमोद घुगे यांनी सांगितले. प्रसंगी सखी श्रावणी संस्था अध्यक्षा राजश्री नेवे, ग्लोबल फाऊन्डेशन अध्यक्षा श्रध्दा नेवे, स्मिता माहुरकर, प्रियंका नेवे, रसिका माहुरकर गिरीश नेवे, जयश्री पाटील, वैभव नेवे ,मनोज भदाणे , दीपक मोराडे ,राहुल पाटील, विलास नेवे यांचेसह संस्थाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमास प्रमोद घुगे, समाधान पाटील, सचिन माळी, सागर कुटुंबळे, राहुल महाजन, उमेश नेवे, राजेंद्र पाटील, चेतन ठाकुर, दुर्गेश झोपे, अनिकेत साळी, मनोज चौधरी, हर्षल नेवे, गौरव वारूळकर यांचेसह चंद्रशेखर नेवे यांचे अनमोल सहकार्य लाभले .