भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस. २६ जुलै १९७९ रोजी त्यांचा जन्म झाला. लोकनायक अशी ओळख असलेले भाजपाचे नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन भक्कम पणे सामाजिक, राजकीय जबाबदाऱ्या पेलत समाजसेवेचे काम अविरत सुरु ठेवलं आहे.पंकजा यांच्या वाढदिवसानिमित्त बहीण डॉ.प्रीतम मुंडे यांनी संग्रहात असलेला पंकजाताईंचा अत्यंत दुर्मिळ फोटो सोशल मीडियावर शेअर करून शुभेच्छा संदेश दिला आहेत.
डॉ. प्रीतम मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बालपणीचा फोटो शेअर करीत एक ट्विट केलं असून त्या शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटलं आहे की,
5 वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…
भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांना मानणारा वर्ग संपूर्ण महाराष्ट्र भर आहे.सर्व सामान्यांचा नेता म्ह्णून त्यांच्या कडे बघितल्या जातं. त्यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांना पर्वणी असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.
