जळगाव, (प्रतिनिधी)-राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्रमुख यंत्रणाना पुढील दोन दिवस दि.24 व 25 रोजी मुख्यालय न सोडण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिनांक 22 रोजी निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की,राज्यात सद्यस्थित मान्सून कालावधी सुरु असल्याने राज्यात आपत्तीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, महापूर, तसेच दरड कोसळने यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होऊन जनजीवन विस्कळीत होतं आहे.
तरी अशा परिस्थिती मध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रमुख यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याने दिनांक 24 जुलै व 25 जुलै रोजी मुख्यालयी हजर राहावे व कोणत्याही सबबीखाली मुख्यालय सोडू नये असे अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे निर्देश आहेत. सदर आदेशाचे पालन करावे तसेच आपल्या अधिनस्त असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना देखील मुख्यालय न सोडण्याच्या लेखी सूचना आपले स्तरावरून द्याव्यात. संबंधित सर्व विभागातील आपली नियंत्रण कक्षात नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांना नेमून दिलेल्या ठिकाणी हजर राहण्याबाबत सूचना देण्यात याव्यात असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.