जळगाव, (प्रतिनिधी) दि. 23 – संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जळगाव यांच्यामार्फत सन 2021-22 मध्ये राबविल्या जाणाऱ्या विशेष घटक योजना (50% अनुदान योजना) व बीज भाडवल योजनेसाठी चर्मकार समाजातील इच्छुक अर्जदारांकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
महामंडळाच्या या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर व होलार इ.) असावा. अर्जदाराने अथवा अर्जदाराच्या पति/पत्नीने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पूर्ण पुर्तता करुन तीन प्रतीत स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रांसह उपस्थित राहून कर्ज प्रस्ताव दाखल करावे.
कर्ज प्रस्तावासोबत जातीचा दाखला, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, शाळेचा दाखला, रेशनकार्ड, मतदानकार्ड/आधारकार्ड व पॅनकार्ड, कोटेशन (जी.एस.टी.क्र.सहित) आवश्यकतेनुसार प्रकल्प आहवाल, वाहनाकरिता लायसन्स/परवाना/बॅच/जामीनदारांचे कागदपत्रे, शपथपत्र इ., जागेचा पुरावा/लाईटबील/टॅक्स पावती/भाडेकरारनामा किंवा 7/12 नमुना, 8 अ चा उतारा, व्यवसायाचा नाहरकत दाखला किंवा शॉपॲक्ट लायसन्स, पासपोर्ट साईज तीन फोटो आदि कागदपत्रे जोडावीत.
या योजनांचा कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यतील झेरॉक्स अर्ज 26 जुलै, 2021 पासून कार्यालयीन वेळेत (सकाळी 10 ते 6.15 वा पर्यंत) संत रोहिदास चर्माद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन इमारत, तळमजला, महाबळरोड, मायादेवी मंदिराजवळ, जळगाव याठिकाणी स्वत: अर्जदाराकडून स्वीकारले जातील. असे एन. एन. तडवी, जिल्हा व्यावस्थापक, संत रोहिदास चर्माद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मर्या., जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000