पाचोरा- भडगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा.प्रवास सुखाचा व्हावा, वेळेची व इंधनाची बचत व्हावी म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी रस्ता सुधारणा व मजबुतीकरणासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून मा.ना.दादाजी भुसे ग्रामविकास राज्यमंत्री यांची वारंवार त्यांच्या दालनात भेटी घेतल्यात. रस्ता दर्जोन्नतीचे गांभीर्य मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले. म्हणून मंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेऊन रस्ता सुधारणांसाठी ०९ कोटी निधी मंजूर केलेला असून प्रशाकीय मान्यता देखील प्राप्त झालेली आहे. लवकरच कामास सुरुवात करण्यात येईल. तरी,खालील कामांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. पाचोरा भडगाव तालुक्यातील १). रामा ३९ भोरटेक खु-टाकळी बु-घुसर्डी-होळ ( लांबी ६.५४ कि.मी) ३६१.८८ रुपये, २). लोहारी खु ते लासुरे रस्ता (लांबी १.६८ कि.मी) ११७.१२ रुपये, ३). भाग रामा ४० सारोळा-वाघुलखेडा-खडकदेवळा रस्ता (लांबी ६ कि.मी) ३७०.७९ रुपये, ४). कोठली ते भराडी वस्ती रस्ता (लांबी १ कि.मी) ६३.८१ रुपये आदी गावांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी ऍड.दिनकर देवरे, दिपकसिंग राजपूत (जि.प.सदस्य),गणेश पाटील (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), अरुण पाटील (शेतकरी सेना जिल्हाप्रमुख), भैय्यासाहेब पाटील, प्रवीण पाटील, सरपंच, उपसरपंच,शिवसेना-युवासेना पदाधिकारी,शिवसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
सोबत फोटो पाठवलेला/मेल केलेला आहे.