घरगुती गॅस सिलिंडर चे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडले असतांना पेटीएमने (Paytm) ने एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला गॅस सिलिंडरच्या बुकींगवर तब्बल 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. म्हणजेच सिलिंडरवर जवळपास 900 रुपयांचा फायदा होऊ शकतो.याबाबत indian oil crop ltd ने आपल्या ऑफिशियल ट्विटर हॅण्डल वरून ट्विट करून माहिती दिली आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ग्राहकांना गॅस सिलिंडर बुकींगवर मिळणाऱ्या या ऑफरबद्दलची दिलेल्या नुसार तुम्हाला पेटीएमवर खास पद्धतीने बुकींग करुन कॅशबॅक मिळू शकतो.गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढत असून भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आताच जुलै महिन्याच्या प्रारंभी विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत पंचवीस रुपयांनी वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत ८४ रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी पेटीएमने (Paytm) ची खास ऑफर दिलासादायक ठरू शकते.