पाचोरा – आषाढी एकादशी निमित्ताने श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी मंदिर व कार्यालय कृष्णापुरी पाचोरा माळी समाज व बहुजन समाजा तर्फे आषाढी एकादशी निमित्ताने सकाळी 8 वा.महारातीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष संतोष भास्कर महाजन,उपाध्यक्ष मयूर महाजन,सुनिल भाऊ महाजन,ज्ञानेश्वर महाजन, चिंधु भाऊ महाजन,चेतन महाजन,शरद गीते सर व पुजारी ताई इतर समाज बांधव उपस्थित होते*त्यानंतर दुपारी 11 वा .समाज भूषण श्रीराम मोतीराम महाले यांच्या कडे आषाढी एकादशी निमित्ताने लहान भजनी मंडळ बाल गोपाल आणि माळी समाज पंच मंडळाला फराळासाठी आमंत्रित केले होते फराळा मध्ये केळी, साबुदाणे,साखरू, पेढे,काकडी,भगर,आमटी,मिर्ची इ फराळाचे भोजन नाना तर्फे देण्यात आले.