मुंबई,(प्रतिनिधी) – अश्लील चित्रपट प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांचे पितळ उघड झाल्याने राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे अडचणीत सापडले आहे.या दोघांना मुंबई सत्र न्यायालयानं २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद आणि काही खुलासे…
नवोदित महिला कलाकारांना वेबसिरीज, मालिकेत काम मिळवून देण्याचं अमिश दाखवून बोलावलं जायचं आणि त्यामध्ये अश्लील व्हिडिओ चित्रीकरण केले जायचे.याबाबत काही तक्रारी क्राईम ब्रांच कडे यापूर्वी प्राप्त झालेल्या होत्या त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यासह अनेक धक्कादायक गोष्टी पोलिसांनी समोर आणल्या आहे अजून पुढे तपासात समोर येईलच.