रावेर (प्रतिनिधी – भागवत महाजन) – शासनाने राज्यातील प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा भरतीवरील बंदी अंशतः उठवली असून पवित्र पोर्टल च्या संकेतस्थळावरून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार असून रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. शासनाने पवित्र पोर्टल चा उपयोग करून शिक्षक भरती करण्यास संघटनेची कुठलीही हरकत नाही.
उलट ही बाब स्वागतार्ह असून सन 2012 नंतर लागलेले कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक प्राध्यापक काही वाढीव पदावरती सेवेत कार्यरत आहेत. काही शिक्षक दहा वर्षापासून अर्धवेळ काम करीत आहेत काही विनाअनुदानित तुकड्या वरती काम करीत आहे. काही अंशदायी अनुदान तत्त्वावरती सेवेत कार्यरत आहे. वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे निर्माण होणारी पायाभूत पदे या पायाभूत पदावर ती अनेक शिक्षक सेवेत कार्यरत आहे. अशा शिक्षकांना नैसर्गिक न्यायाप्रमाणे यांच्या सेवा नियमित करून सेवेत कार्यरत ठेवावे.
शासनाने सद्यस्थितीत रिक्त असणार्या जागा आपल्या धोरणानुसार भराव्यात मात्र सेवेत असणाऱ्या कार्यरत शिक्षकांना सेवेतून कमी करण्यात येऊ नये अशी मागणी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड, आमदार सुधीरजी तांबे, शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षक आमदार किशोर दराडे, शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक आमदार किरण सरनाईक, शिक्षक आमदार जयंत आजगावकर, शिक्षण आयुक्त यांच्याकडे अशा स्वरूपातील मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा कनिष्ठ प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा सुनील सोनार, सचिव प्रा. शैलेश राणे, कार्याध्यक्ष प्रा.सुनील पाटील, प्रा.नंदन वळींकर,माजी अध्यक्ष डी डी पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड, ,प्रा. संजय पाटील, प्रा एस एस चौधरी प्रा जितेंद्र पाटील, प्रा. तायडे यांनी निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे.