पाचोरा – येथील पुनगाव रोड परीसरात सागर सुरेश पाटील रा.पाचोरा या तरूणाचा मोबाईल पुनगाव रस्त्यावर दुपारी ०२:३० ते ०३:०० वाजे दरम्यान हरवला होता.
त्या नंतर त्यावरून पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पो.ना.राकेश खोंडे,व पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल हटकर,हे दोघे मोटारसायकल ने पुनगाव रस्त्यावर जात असताना सदर oppo कंपनी मोबाईल रस्त्याचा कडेला पडलेला निदर्शनास आला त्यावेळी तो मोबाईल बंद होता.
सदर मोबाईल पो.ना.राकेश खोंडे,विशाल हटकर यांनी तो मोबाईल प्रामाणिक पणाने पाचोरा पोलीस स्टेशनला जमा केला.
सागर सुरेश पाटील या तरूणाने मोबाईल हरवल्याची तक्रार पाचोरा पोलीसात दाखल केली होती.पोलीसांनी मोबाईल चे बील तपासुन जमा केलेला मोबाईल पाचोरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विजया वसावे, ठाणेअंमलदार पो.ना.सुर्यकांत नाईक,पो.ना.राकेश खोंडे,प्रशांत पाटील, विशाल हटकर यांच्या समक्ष तरूणास मोबाईल देण्यात आला.