मुंबई,(वृत्तसंस्था) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (SSC ans HSC Board) शिक्षण मंडळातर्फे उद्या दिनांक 16 शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजता 10 वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
याबाबत शिक्षणमंत्री ना.वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली असून दहावीचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर भेट देऊन पाहायचा आहे.न
अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.