चाळीसगाव प्रतिनिधी, सोमवार दिनांक 12 रोजी पारोळा येथील शिव संपर्क अभियान कार्यक्रमाप्रसंगी चाळीसगाव येथील शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक वसीम भाई शेख चेअरमन यांची अल्पसंख्यांक चाळीसगाव शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली.
त्याप्रसंगी संपर्कप्रमुख संजय जी सावंत, पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील,आमदार चिमन आबा पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख हर्षल माने, उपजिल्हाप्रमुख नाना पाटील, महिंद्र बापू पाटील, तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, भीमराव खलाने,महिला तालुकाप्रमुख सविताताई कुमावत, एसटी कामगार सेना चाळीसगाव शहर प्रमुख रघुनाथ तुकाराम कोळी यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी यांच्यासमक्ष वसीम भाई चेअरमन यांची अल्पसंख्यांक शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.