मुंबई, (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब प्रकाश आंबेडकर हे तीन महिन्याच्या दीर्घ सुटीवर जात असून ते तीन महिने कुठल्याही राजकीय कार्यक्रमात अथवा निवडणूक कार्यक्रमात सहभागी होणार नसून व्यक्तिगत कारणास्तव तीन महिन्याच्या सुट्टीवर जात असल्याचा व्हिडीओ खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करून शेअर केला आहे.
अनेक नेते सुट्टीवर जात असतांना पहिले आहे त्यात काही नवीन नसले तरी एवढ्या दीर्घ सुट्टीवर जाण्याची ही पहिलीच घटना असावी.
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी याची नोंद घ्यावी ही विनंती! @VBAforIndia pic.twitter.com/pezJFwou9y
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 8, 2021
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर गेले असून प्रकाश आंबेडकर यांनी प्रभारी अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.