यावल,(प्रतिनिधी)- शहराच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या बाजीराव काशिदास कवडीवाले या सराफी दुकानात दुपारी एक वाजेच्या सुमारास काही लुटारुंनी धुमाकुळ घालत बंदुकीच्या धाक दाखवत या लुटारुंनी दहशत निर्माण केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दुपारी अचानक सराफी दुकानात आलेल्या लुटारुंनी दुकान मालक जगदीश कवडीवाले यांच्या गळ्याला पिस्तुल लावत. जो काही माल असेल तो काढून द्या असे म्हणत त्यांनी धमकावण्यास सुरुवात केली. दरम्यान दुकानाच्या बाहेर नागरिकांनी गोंधळ केल्याने अज्ञात लुटारुंनी पलायन केले. लुटारुंना विरोध करणा-या एका जणाच्या दिशेने लुटारुने गोळी झाडली. ती गोळी कुणाला लागली नाही मात्र त्या आवाजाने परिसरात दहशत निर्माण झाली होती.
लुटारु पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. त्यांनी नेमका किती माल लुटून नेला? ते कुठले होते? ते कुठे पळाले? याचा शोध पोलिस घेत असून ते लवकरच पकडले जातील असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.