मुंबई,दि.७ – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली असून या अटकेने खळबळ उडाली आहे.
भोसरी भूखंड प्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याचे समजते. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची देखील ईडी कडून चौकशी करण्यात आली होती दरम्यान आज खडसेंच्या जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.