पाचोरा : संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेचा विचार करता जिल्ह्यामध्ये व्हेंटिलेटर बेड, ऑक्सीजण बेड,
उपकेंद्र येथे कोव्हीड सेंटर उपलब्ध करणे या संदर्भात अॅड दिपक पाटील यांनी जिल्हाधीकारी यांना निवेदन दिले.
जळगाव जिल्ह्यामध्ये कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक केंद्र व उप केंद्रामध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सीजन बेडची
सुस्थीतीत व्यवस्था करणे व कोव्हीड सेंटर उभारणे हे गरजेचे आहे जेणे करून जिल्ह्यातील ग्रामीण
भागातील सामान्य गोरगरीब नागरिक यांना त्याचा लाभ होईल आणि जास्तीत जास्त गरीब जनतेला ह्या
कठीण काळात आर्थिक शारिरीक मदत होईल. तरी कृपया येणाऱ्या काळात रुग्णाची होणारी हेळसांड व महामारी ही थांबवता येईल. तरी प्रशासनाने केलेल्या सूचनेचा गांभीर्याने विचार करावा.