दोंडाईचा- आदीवासी टोकरे कोळी जमातीच्या धुळे/नंदूरबार जिल्हातील वाल्या सेनागृप च्या धाडसी तरूणांची पहीली मिटींग धुळे जिल्हातील दोंडाईचा जवळील झोतवाडे या आदीवासी टोकरे कोळींचे संपुर्ण गाव असलेल्या गावात दि.२५ रोजी पार पडली.या मिटींग मध्ये वाल्या सेनेच्या मागील कार्याचा आढावा घेऊन समाजावर विशेषता महीलांवर होत असलेल्या अन्याय कारक घटनांचा वाढता आलेख बघता.
महीलाभगींच्या मदतीला धावून जाणाऱ्या तसेच करोना काळात स्वताच्या जीवाची पर्वा न करता गोरगरीब लोकांसाठी दवाखान्यामध्ये स्वता पेशंट ला दाखल करणा-या तसेच देखरेख करणा-या विनामुल्य मदत करणारे बांधव वाल्या सेना गृप चे सदस्य.रवीभाऊ शिरसाठ.रंजाणेकर,मयूर सोनवणे, दोंडाईचा,संजय कोळी,दोंडाईचा
सुनिल भाऊ कोळी,शहादा अप्पा कोळी,दोंडाईचा,अमोल नवसारे,खेड़े,संदीप ईशी.रंजाणे, हेमराज कोळी.धुळे
चेतन कोळी अंतुर्ली, गणेश कोळी सारंगखेडा,
ईश्वर कोळी कार्ली, विजय चित्ते आनंद खेडे,रवीद्र कोळी न्याहळोद, दिलीप कोळी अकलाड मोराणे, मुकेश कोळी अंतुर्ली, अक्षय कोळी थाळनेर, गणेश कोळी झोतवाडे,विकी कोळी साहूर,लक्षण कोळी शनिमांडळ,भुषण कोळी देगांव, श्रीकांत कोळी देगांव
या सर्वांनी करोना काळात गोरगरीब लोकांसाठी धावून जावून करोना योध्दा बनून अहोरात्र मदत केली त्याबद्दल या सर्व वाल्या सेना गृप च्या धडाकेबाज निडर सदस्यांचा धुळे येथील सामाजिक कार्यकर्त्या , सौ गीतांजली कोळी यांनी वीरांगना झलकारी बाई कोळी संस्थेच्या वतीने झोतवाडे येथील महर्षि वाल्मीकी ऋषि समाज मंदीरात करोना योध्दा सन्मान पत्र देऊन सत्कार केला.
आदीवासी कोळी समाजाच्या या मदतकार्यासाठी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या वाल्या सेना गृप ची पहीली मिटींग दोंडाईचा जवळील झोतवाडे या गावात पार पडली….या मिटींग साठी शहादा, नंदूरबार, धुळे, दोंडाईचा, शिरपुर, शिंदखेडा, साक्री येथील धडाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी समाजातील समस्या, अन्यायकारक घटना याबद्दल युवा पिढीचे मत विचारात घेऊन सौ गीतांजली ताई कोळी यांनी मार्गदर्शन केले. समता माध्यमिक विद्यालय झोतवाडे चे मुख्याध्यापक
श्री. सुरेश कुवंर सर यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी समाजातील अनेक तरूणांनी वाल्या सेनेच्या कार्याशी प्रामाणिक राहून कोळी समाजाचा सन्मान वाढवून मदतकार्यासाठी धावून जाण्याची शपथ घेतली.