Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

1954 पासून अत्यंत प्रतिष्ठित “खादी एम्पोरियम” वर बंदी ; आयोगाची मोठी कारवाई

najarkaid by najarkaid
February 5, 2022
in राज्य
0
1954 पासून अत्यंत प्रतिष्ठित “खादी एम्पोरियम” वर बंदी ; आयोगाची मोठी कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने  (KVIC),  अलिकडच्या वर्षांत बनावट/खादी नसलेल्या उत्पादनांच्या विक्रीविरुद्ध कडक धोरण अवलंबले आहे. त्यानुसार आयोगाने,  मुंबईतील डॉ. डी. एन. मार्ग इथल्या मेट्रोपॉलिटन इन्शुरन्स हाऊस, येथे 1954 पासून अत्यंत प्रतिष्ठित “खादी एम्पोरियम” चालवण्याऱ्या मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशन (MKVIA) या सर्वात जुन्या खादीविक्री  संस्थेचे ‘खादी’ प्रमाणपत्र रद्द केले आहे.

डॉ. डी.एन. मार्ग  येथील खादी एम्पोरियम अस्सल खादी उत्पादनांच्या मिषाने,  खादी नसलेल्या उत्पादनांची विक्री करत असल्याचे आयोगाला  आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नियमित तपासणी दरम्यान, आयोगाच्या अधिकार्‍यांनी एम्पोरियममधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये ही उत्पादने खादी नसल्याचे आढळून आले.  आयोगाने जारी केलेल्या “खादी प्रमाणपत्र” आणि “खादी प्रमाणचिन्ह  प्रमाणपत्र” च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आयोगाने मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशनला कायदेशीर नोटीस जारी केली.

नोंदणी रद्द केल्यामुळे, खादी एम्पोरियमला अस्सल खादी विक्री केंद्र म्हणून मान्यता राहणार  नाही आणि यापुढे एम्पोरियममध्ये खादी उत्पादने विकण्याची परवानगीही नसेल. विश्वासार्हतेचा भंग केल्याबद्दल आणि खादी ब्रँडची विश्वासार्हता आणि लोकप्रियता यांचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर जनतेची फसवणूक केल्याबद्दल मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशनविरुद्ध  (MKVIA)  कायदेशीर कारवाईचा विचार आयोग करत आहे.

एम्पोरियममधून फक्त “अस्सल खादी उत्पादनेच” विकण्याच्या सक्त अटीवर  आयोगाने 1954 मध्ये खादी एम्पोरियमचे संचालन आणि व्यवस्थापन MKVIA या नोंदणीकृत खादी संस्थेकडे सोपवले होते.  मात्र अलिकडच्या वर्षांत, MKVIA  बनावट खादी उत्पादने विकून अनुचित व्यापार पद्धतींमध्ये गुंतले होते. त्यामुळे हे एम्पोरियम खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून चालवले जात असल्याचा समज असलेल्या लोकांची फसवणूक होत होती.

गेल्या काही वर्षांमध्ये  आयोगाने “खादी इंडिया” या आपल्या ब्रँड नावाचा गैरवापर आणि ट्रेडमार्कच्या उल्लंघनाविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. आयोगाने आत्तापर्यंत 1200 हून अधिक व्यक्ती आणि कंपन्यांना “खादी” या ब्रँड नावाचा गैरवापर केल्याबद्दल आणि “खादीच्या” नावाखाली  बिगर खादी उत्पादने विकल्याबद्दल कायदेशीर नोटीस बजावल्या आहेत. यात किरकोळ ब्रँड फॅबइंडियाचा समावेश असून आयोगाने फॅब इंडियाकडून 500 कोटी रुपयांच्या नुकसानीची मागणी केली असून प्रकरण  मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. गेल्या

वर्षी, आयोगाने अमॅझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या ऑनलाइन शॉपिंग पोर्टल्सना, खादी नसलेली उत्पादने “खादी” म्हणून विकणाऱ्या 140 वेब लिंक्स काढून टाकण्यास भाग पाडले होते.

अशा अनेक प्रकरणांमध्ये,  उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध आयोगाने न्यायालयात दाद मागितली असून  “खादी” या ब्रँड नावाचा गैरवापर करण्यास रोखणारे आदेश प्राप्त केले  आहेत. परिणामी, अनेक उल्लंघनकर्त्यांनी माफी मागितली आणि भविष्यात “खादी” या ब्रँड नावाचा वापर न करण्याची हमी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुम्हाला कान, नाक,घसा यापैकी कुठलाही त्रास असल्यास एकदा तपासून घ्या ; तपासणी व शस्रक्रिया मोफत

Next Post

‘गंगूबाई काठियावाडी ‘आगामी चित्रपटात ‘सेक्स वर्कर’ च्या भूमेकीत आलिया भट ; बोल्ड अभिनयाला चाहत्यांची पसंती

Related Posts

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Next Post
‘गंगूबाई काठियावाडी ‘आगामी चित्रपटात ‘सेक्स वर्कर’ च्या भूमेकीत आलिया भट ; बोल्ड अभिनयाला चाहत्यांची पसंती

'गंगूबाई काठियावाडी 'आगामी चित्रपटात 'सेक्स वर्कर' च्या भूमेकीत आलिया भट ; बोल्ड अभिनयाला चाहत्यांची पसंती

ताज्या बातम्या

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us