रावेर ता.प्रतिनिधी : दि.10 (विनोद कोळी)-
मुक्ताईनगरचे गटविकास अधिकारी असलेले संतोष नागटीलक यांच्या कडून वृत्तसंकल करण्यास गेलेल्या पत्रकारांस दमबाजी करत माज्या बद्दल बातमी लावायला कोणी सांगितलं, आताच तुज्यावर गुन्हा दाखल करतो या भाषेत आवाज दडपण्याचा व लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला या कृत्यामुळे पत्रकारांमध्ये घबराटीचे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अश्या अधिकाऱ्यांवर बदलीच नव्हे तर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे, मुक्ताईनगर येथील मंडे टू मंडे चे स्थानिक पत्रकार अक्षय काठोके यांनी चांगदेवचे ग्रामसेवक रामकृष्ण चौधरी यांच्या कार्यालयात हजर राहत नाही, नागरिकांना अर्वाच्य भाषेत बोलतात, नियमानुसार ड्युटीच्या गावी रूम घेऊन राहणे बंधनकारक असतांना ते ड्युटी च्या गावी न राहता बाहेर गावावरून ये-जा करता आशा मनमानी कारभाराबाबत व गटविकास अधिकाऱ्यांच्या जुन्या आदेशावरील तारीख खोडत या वर्षाची तारीख पेनाने लिहून खोटी आदेशाची पत्र दाखवत बनावट पत्र दाखवत नागरिकांची खुशाल दिशाभूल केली. हा सर्व प्रकार गटविकास अधिकारी संतोष नागटीलक यांच्या निदर्शनास आणून दिला मात्र, लक्षात आणून देऊनही गटविकास अधिकारी संतोष नागटीलक हे नेमक्या कोणत्या हेतूने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करुन संबधित ग्रामसेवकाची पाठराखण करीत आहेत, तसेच एक महिला ग्रामसेवकांकडे गेली असता आमचं कोण काय वाकड करून घेईल. त्या बातमी लावणाऱ्याला गट विकास अधिकाऱ्याकडे बोलून पाहून घेऊ असा दम दिला, यावर गट विकास अधिकारी यांच्या कडून कुठली चौकशी वा कारवाई होत नसल्याचे दिसून आल्याने यासंदर्भात ग्रामसेवकावर चौकशी करून कारवाई का केली जात नाही ? त्यांना पाठिशी का घातलं जातंय ? असे विचारत प्रतिक्रिया मागितली असता त्यांना या गोष्टीचा राग येऊन पत्रकार काठोके यांना अर्वाच्च भाषा वापरत तुला मध्ये कोणी येऊ दिल, आणि माज्या विरुद्ध बातम्या लावायला तुला कोणी सांगितलं. तुज्यावर आताच गुन्हा दाखल करेल. अशी दमदाटी करत अपमानास्पद वागणूक देत धमकी दिली एका वृत्तसंकलंन करणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सदरील अधिकाऱ्याकडून केला गेला. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे. या कृत्यामुळे पत्रकारांमध्ये घबराटीचे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अश्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
पत्रकारास झालेल्या अन्यायाच्या वास्तव माहिती तालुक्यातील पत्रकारांना घडलेला सर्व मजकूर संबधी उपस्थित पत्रकारा समोर मांडला, असा सर्व मजकूर ऐकल्यानंतर सर्व पत्रकाराच्या विचारा नुसार एकमत होऊन. घटनेचे गांभीर्य व संबंध हा वृत्त प्रकाशित करण्याशी तसेच सबंधी अन्याय ग्रस्त हा पत्रकार असल्यामुळे गट विकास अधिकारी संतोष नागतीलक यांनी केलेले वर्तन हे त्यांना शोबनीय नसल्यामुळे त्यांचा प्रकार हा लोक शाहीच्या चौथ्या स्तंभला दडपण्याचा हेतूने केलेला असल्याने जर असेच अधिकारी पत्रकारांना धमक्या देत असतील तर पत्रकार संरक्षण कायदा काशासाठी ? एकंदरीत पत्रकारांच्या आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असून उपस्थित सर्व पत्रकाराच्या वतीने त्या निषेधार्थ रावेर तहसीलदार कार्यालयात नायब तहसिलदार श्री पवार साहेब यांना त्या गटविकास अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार रावेर तालुका संघाचे तालुकाध्यक्ष विलास ताठे,उपाध्यक्ष संतोष नवले,सचिव योगेश सैतवाल,संघटक प्रदीप महाराज पंजाबी, सहसंघटक विनायक जहुरे,म.रा.पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा रावेर शहराध्यक्ष विनोद कोळी,शेख अजीज ,शेख शरीफ,प्रमोद कोंडे, संजय पाटील,अतुल धंजे, सुमित पाटील,भूषण सोनवणे,महेंद्र पाटील,उमेश कोळी,संतोष पाटील,राजेंद्र अटकाळे,भीमराव कोचुरे,जगनाथ लुल्हे, संभाजी पाटील,आकाश भालेराव रावेर तालुक्यातील पत्रकार बंधू यावेळी उपस्थित होते.