रावेर,(भागवत महाजन)- रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथे लसीकरण मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद देत . दि.5 जून रोजी, विवरे खुर्द येथे ग्रामपंचायत विवरे खुर्द ॲप्लिकेशन प्रणालीचा वापर करून नागरिकांना लसीकरणाची नोंदणी करण्यात आली. लसीकरणाची ॲप द्वारे नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील स्वयंसेवक व अनेक तरुण मंडळींनी पुढाकार घेऊन नागरिकांचे यशस्वीरित्या रजिस्ट्रेशन करून दिले. तसेच लसीकरणापासून लोक वंचित राहू नये यासाठी ग्रामपंचायत सदस्य व स्वयंसेवक यांनी गावांमध्ये फिरून नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले.
लसीकरण प्रक्रियेसाठी निश्चित वेळ उपलब्ध झाल्याने नागरिकांची होणारी गैरसोय व विनाकारण होणारी गर्दी यापासून दिलासा मिळाला . तसेच नागरिकांचे या ॲप द्वारे रजिस्ट्रेशन झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या लसीकरणाची यादी एक दिवस आधी जाहीर करण्यात आले. लसीकरण अतिशय सुरळीत पद्धतीने पार पडले व लसीकरण प्रक्रियेत नागरिकांना वाट बघावी लागली नाही किंवा जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागले नाही.लसीकरणासंबंधित नोंदणी प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने उपलब्ध असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरनाचा लाभ घेता आला. तसेच १४८ लोकांची RT-PCR कोरोणा चाचणी समुदाय वैद्यकीय अधिकारी श्री गणेश कचरे , आरोग्य सेवक शुभम महाजन यांच्या द्वारे घेण्यात आली. परिचारिका प्रतिभा भंगाळे यांनी लसीकरण तर आशा सेविका तनुजा मानकरे व इंदुबाई पाटील यांनी मदतनीस म्हणून कामकाज सांभाळले.
लसीकरणाच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी अल्फा कम्प्युटर चे संचालक प्रा.श्री शिरीष पाटील , प्रा. राहुल पाटील, अरविंद परदेशी, विक्रम पाटील, प्रदीप पाटील, हर्षल चव्हाण, राहुल चव्हाण , अशुतोष पाटील,मुकेश पाटील, किरण पाटील, ईश्वर महाजन , मयूर सूर्यवंशी , कुंदन देशमुख, विशाल देशमुख इत्यादी स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले. विवरे खुर्द येथे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चिनावल श्री . डॉ पी. आर. ठाकूर यांनी लासीकरण केंद्राला भेट दिली असता ग्रामपंचायतीतर्फे राबवण्यात आलेल्या या अद्यावत पद्धतीचे त्यांनी कौतुक केले. विवरे खुर्द मोडेलचे संपूर्ण जिल्ह्यात अनुकरण करण्यात यावे व प्रत्येक ग्रामपंचायतीतर्फे लसीकरणासाठी या पद्धतीचा वापर करण्यात यावा असे मत ग्रामपंचायत सदस्य श्री. संदिप पाटील व दिपक गाढे यांच्याशी बोलतांना श्री. डॉ. ठाकूर यांनी व्यक्त केले. तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. शिवराय पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
गावाला करोनामुक्त करण्याचा ध्यास घेऊन ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच , सदस्य , पोलीस पाटील, त्याच बरोबरीने सर्व ग्रामस्थ अतिशय तळमळीने प्रयत्न करीत आहेत.लसीकरण यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य श्री .संदिप पाटील यांनी सर्वांचे सहकार्याबद्दल आभार मानले.