जळगाव प्रतिनिधी : जिल्हा शिवसेनेतील पदाधिकार्यांमध्ये खांदेपालट करण्यात आला. शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती करण्यात आली. तर माजी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांना जिल्हा संपर्क प्रमुखपदी बढती देण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात जळगाव लोकसभा क्षेत्रात नवीन पद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जळगाव, अमळनेर, जळगाव ग्रामीण, विधानसभा क्षेत्र जिल्हाप्रमुखपदी विष्णु भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, या विधानसभा क्षेत्रांसाठी हर्षल माने यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विष्णु भंगाळे हे जळगाव महापालिकेत शिवसेना नगरसेवक आहेत. ते माजी महापौर आहेत. कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य आहेत. तर हर्षल माने हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. माजी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे आता जिल्हा संपर्क प्रमुख असतील. तर आता रावेर लोकसभा क्षेत्रात आता अशाच पद्धतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत.