रावेर,(भागवत महाजन)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आज ७ वर्ष पूर्ण केल्यानिमित्त आजचा दिवस भाजपतर्फे सेवाकार्य दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.
रावेर तालुका गटा प्रमाणे विवरे येथील ग्रापंचायतीला भेट देऊन देशावर आलेल्या महामारी कोरोना रोगापासुन बचाव व्हावा याकरीता तालुक्यातील विवरे गांव कोरोना मुक्त करण्यासाठी माक्स देऊन गावातील समस्या जाणुन घेतल्या विवरे बु ॥ ग्रापंचायत सदस्य व भा ज पा तालुका उपध्यक्ष श्री वासुदेव नरवाडे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी विवरे ते ऐनपुर रस्ता हा डांबरीकरण पीडब्ल्यू च्या माध्यमातून करून द्यावा . तसेच पीएसी नविन आरोग्य केंद्र उभारण्यात यावे जेष्ठ नागरिकांनकरता खुली व्यायम शाळा करून द्यावी गावतील नविन भागात स्ट्रीटलाईट द्यावे या कामांची मागणी केली . जि प अध्यक्षा सौ रंजना पाटील यांनी गावहितासाठी तुमच्यामागण्या पूर्ण होतील असे सांगितले. तसेच जि प अध्यक्षा सौ रंजना पाटील यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्या सौ स्नेहा पाचपांडे , रेखा गाढे, सौ ज्योति सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आला . समाज सेवक श्री प्रल्हाद पाटील यांचा सत्कार सरपंच युनुस तडवी यांच्या हस्ते करण्यात आला.
यांची होती उपस्थिती – रावेर पंचायतसमिती सदस्या योगिता वानखेडे समाज सेवक श्री प्रल्हाद पाटील , स्वीयसहाय्यक रमाकांत पाटील ,विवरे बु ग्रामपंचायत सरपंच युनुस तडवी पॅनलप्रमुख श्री वासुदेव नरवाडे उपसरपंच सौ भाग्यश्री पती विकास पाटील , युसुफ खाटीक,सदस्या सौ स्नेहा पाचपांडे , रेखा गाढे , नौशदबी खाँ शेख ईसमाईल खाँ , सौ ज्योति सपकाळ , सौ मनिषा पाचपांडे , पुनम बोंडे , संदीप पाटील , सुभाष पाटील , रामदास वानखेडे , दिपक गाढे , गणेश सपकाळ , याकुब शेठ, दिपक राणे व नागरीक उपस्थित होते .