जळगाव प्रतिनिधी : मागील गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात नव्या कोरोना बाधितांची संख्या घटत असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढत आहे. त्यामुळे ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. अशातच जळगाव जिल्हा राज्यातील सर्वात कमी पाॅझिटीव्हीटी दरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी दर अवघा 3.83 टक्क्यावर आला आहे. दरम्यान, राज्यात भंडारा जिल्हाचा पाॅझिटीव्हीटी दर 3.44% इतका असून तो पहिल्या स्थानी आहे.
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची सांखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम जळगाव जिल्ह्याला दिसून येत आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण वाढत असून मृत्युदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी दर अवघा 3.83 %.वर आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटीचा दर हा राज्यातील दुस-या स्थानी आहे तर भंडारा जिल्हा 3.44% पहिल्या स्थानी आहे. राज्यातील सरासरी पॉझिटीव्हीटीचा दर हा तब्बल ११.०६ टक्के आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग आढळून येत आहे. अगदी सातार्यात तर २१.९३ टक्के इतका पॉझिटीव्हीटीचा दर आहे. या पार्श्वभूमिवर, जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग हा आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येत असून यासाठी जिल्हाभरात लसीकरण केंद्र सुरु केले आहेत.