कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी :- येथून जवळच असलेल्या सोनबर्डी – हनुमंतखेडे सिम येथील ग्रामस्थांनी एरंडोल-पारोळा विधान सभेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार केला.
सविस्तर माहिती अशी की , मागील महिन्यात मा.आमदार चिमणराव पाटील यांना तापी खोरे पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्ष पदी (राज्य मंत्री दर्जा ) पदी नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. त्या प्रसंगी सोनबर्डी येथील सरपंच रावसाहेब पाटील , पत्रकार भाऊसाहेब पाटील सर , श्रीराम पाटील , सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील , चंदन पाटील , ईश्वर पाटील , संतोष पाटील , विनोद पाटील , बाळू पाटील , विलास पाटील , राहुल पाटील , आबा पाटील, संजय ब्राम्हणे, कैलास ब्राम्हणे, व तसेच सोनबर्डी येथील शिवसेना शाखाप्रमुख साहेबराव पाटील व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Attachments area